टॉप बातम्या

विविध ठिकाणाहून गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : एकदा मोबाईल हरवला की, मिळणं फार कठीण आहे. अशी समाज लोकात आहे. गेला तर गेला म्हणून अनेकजन तक्रार करण्यासाठी धजावत नाही.परंतु जमाना मोबाईलचा आहे, महागडा मोबाईल, तोच परत घेतो म्हटलं तर पैसा  लागतो. यामुळे आता हरवलेला मोबाईल परत मिळवा म्हणून तक्रारी केल्या जाते.

पोलीस स्टेशन वणी येथे विविध तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल विविध ठिकाणावरून गहाळ झाल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती. 

त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वणी येथील सायबर विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी CEIR पोर्टल वरून तांत्रिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट तपास करून एकूण 13 मोबाईल शोधून काढले असून सदरचे हरवलेले मोबाईल हस्तगत करून आज दिनांक 18/09/2025 रोजी मोबाईल धारक मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.यावेळी मुळ मालकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभारही मानले.
       
सदरची कार्यवाही ठाणेदार उंबरकर वणी यांचे मार्गदर्शनात LPC 493 छाया उंमरे यांनी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();