टॉप बातम्या

विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतातील विद्युत प्रवाहामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पठारपुर येथे दि. 14 सप्टेंबर रोजी घडली. घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रमोद कवडु गारघाटे (52) रा. पठारपुर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे बुधवारी (ता.14) रोजी प्रमोद आपल्या शेतात गेले होते, दरम्यान इलेक्ट्रिक मोटार पंप सुरू करण्यासाठी मीटर बॉक्स उघडताच त्यांना विद्युत प्रवाहाचा झटका लागला ही घटना सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपासकार्य सुरू आहे.

त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील व आई असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();