टॉप बातम्या

जन्मदाती आईवर बलात्कार करणा-या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

केळापूर : घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, वणी तालुक्यात १९/०७/२०२१ रोजी पिडिता/आई ही तिच्या मुलीला भेटण्याकरिता गेली होती. आरोपी याने पिडित आईला "तु मुलीला भेटायला का गेली असे म्हणून तिला दोन ते तिन दिवस मारहाण केली. 

घटना दिनांक २३/०७/२०२१ रोजी शुकवारी रात्री ०९.०० चे दरम्यान पिडितेची पती झोपल्यानंतर आरोपी दारूच्या नशेत घरी आला व पिडिताला जेवणाची मागणी केली असता तिने जेवणाचे ताट आरोपीला त्याच्या रूममध्ये नेउन दिले. आरोपीचे जेवण झाल्यावर त्याने तिला प‌ट्टयाने खूप मारले आहे. तुला मलम लाउन देतो असा म्हणून पिडितेचे पायाला मलम लाउन देत असताना तिचे तोंड दाबले व तिला मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीने त्याने पिडितेला धमकी देउन मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवीत होता. व तिला जिवे मारण्याची धमकी देउन जबरदस्तीने अत्याचार केला. सदरहू घटनेच्या पश्चातामुळे व परत वरील प्रमाण पुन्हा घटना करेल ह्या भितीपोटी पिडित आईने विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने तिला खासगी हॉस्पिटल वणी येथे भरती करण्यात आले व सहा दिवसानंतर होश आल्यानंतर तिने पोस्टे. वणी येथे दिनांक ३०/०७/२०२१ रोजी आरोपी विरुध्द रिपोर्ट दिल्यावरून पो.स्टे. वणी यांनी, भांदवी कलम ३७६(२) (एफ), ३७६ (२) (एन), ३२३. ५०६ अन्वये अपराध क. ६०४/२१ ची नोंद करून पोलिस उपनिरिक्षक अरूण नाकतोडे यांचेकडे तपास सोपविण्यात आला व त्यांनी तपासअंती प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे दिसत असल्याने, आरोपी यांचे विरूद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र सत्र न्यायालय केळापूर येथे दाखल केले.

अभियोग पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता श्री रमेश डी. मोरे एकूण ८ महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले वि. सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी अभियोग पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपी यास भादवी कलम ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन), अन्वये दोनही गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा व १०,०००/-दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व भांदवी चे कलम ३२३ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू दंड व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भादवी चे कलम ५०६ मध्ये २ वर्ष सश्रम कारावास ४०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिना सजन कारावासाची शिक्षा व सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश विद्यमान सत्र न्यायाधिश केळापूर श्री. अभिजित देशमुख साहेब यांचे न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२५ रोजी ठोठावली. आरोपी करिता आई सिध्दार्थ लोढा यांनी बाजू मांडली. पैरवि अधिकारी पी. हे.कॉ. संतोष मडावी ब.स. ७९२ यांनी साक्षदार हजर करण्याचे काम पाहिले.

 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();