टॉप बातम्या

महाआरोग्य शिबीराचा हजारो रुग्णांनी घेतला लाभ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि.१७ सप्टेबर ते २ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दि. १७ संप्टेबर रोज बुधवारला शहरातील बाजोरीया लॉन येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराच्या उद‌्घाटन सोहळ्याला भाजपाचे माजी आमदार तथा भाजपा नेते संजिवरेड्डी बोद‌कुरवार, विजयबाबु चोरडीया प्रदेश कार्यकारिणी सदस्य, दिनकरराव पावडे किसान आघाडी प्रमुख, विजय पिदुरकर माजी जि.प सदस्य, पवन एकरे ओबीसी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा, संजय पिपंळशेंडे जिल्हा उपाध्यक्ष, ॲड.कुणाल चोरडीया जिल्हा उपाध्यक्ष, ॲड निलेश चौधरी वणी शहर अध्यक्ष, जेष्ठ नेते प्रा. महादेवराव खाडे, लक्ष्मण उरकुडे, सौ मंगला पावडे, सौ.संध्या अवताडे, सौ महाकुलकर, सौ.उमा पिदुरकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थीत होते. 
सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते "सेवा पंधरवाडा" लोगोचा अनावरण करण्यात आले.
या शिबीरामध्ये लता मंगेशकर हॉस्पीटलची तज्ञ डॉक्टरांच्या टीमचे सहकार्य लाभले.

शिबीरामध्ये रुग्णांची हुदयरोग तपासणी, स्त्री रोग तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, कार्डी ओथोरासीक इत्यादी तपासणी केल्यानंतर रुग्णांचे ऑपरेशन करण्याची गरज असल्यास विनामुल्य सर्व आपरेशन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. या शिबिराला डॉ. रोहीत चोरडीया यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक भाजपचे शहराध्यक्ष ॲड निलेश चौधरी यांनी केले. शिबिरात हजारो रुग्णांनी लाभ घेतला असुन महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्याकरिता भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

या शिबिरामध्ये सातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शंभर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याकरता नागपूर येथे पुढील उपचारार्थ पाठवण्यात येणार आहे. सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया विनामूल्य होणार असल्याचे कुणाल चोरडिया जिल्हा उपाध्यक्ष यांनी सह्याद्री चौफेरशी बोलताना माहिती दिली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();