टॉप बातम्या

माधव सरपटवार यांना जैताई मातृगौरव पुरस्कार जाहीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीवणी नगरीची ग्रामदेवता असणाऱ्या आई जैताई मंदिरात दरवर्षी दिला जाणारा जैताई मातृगौरव पुरस्कार यावर्षी वणी येथील सुप्रसिद्ध समाजसेवक माधव गंगाधर उपाध्य उर्फ बाळासाहेब सरपटवार यांना जाहीर झाला आहे.

आदर्श विद्यालय वणी येथे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी श्री जैताई देवस्थानच्या कार्यात आरंभी सचिव आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे. समितीने एकमताने सरपटवार यांची निवड केल्याचे विशेष महत्त्व आहे.

पुरस्कार सोहळा
• सोळावे वर्ष
• दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
• वेळ : सायं. ७.३० वा.
• स्थळ : श्री जैताई देवस्थान पटांगण, वणी

या भव्य सोहळ्यात वनराई संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी अध्यक्षस्थानी असतील. तसेच दैनिक तरुण भारत, नागपूर चे संपादक आणि वणीचे सुपुत्र शैलेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

पुरस्कारामध्ये रु. ११,००० रोख, महावस्त्र, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.

विशेष कार्यक्रम
• श्री शैलेश पांडे यांचा सत्कार
• सुनील इंदुवामन ठाकरे यांनी संपादित केलेल्या श्री माधव सरपटवार यांच्या आत्मकथनात्मक “माझे जीवन गाणे” या पुस्तकाचे प्रकाशन
• त्यानंतर शैलेश पांडे यांचे पुस्तकावरील भाष्य

कार्याचा गौरव
तब्बल २३ वर्षे सचिवपदावर आणि त्यानंतर आजपर्यंत अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या, सध्या वयाच्या ८५ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा देणाऱ्या माधव सरपटवार यांच्या योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.

त्यांनी मंदिरात राबवलेले विविध उपक्रम, तसेच केलेला सर्वांगीण विकास ही त्यांची कार्याची वैशिष्ट्ये आहेत.

आवाहन
या सोहळ्याला वणीकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैताई देवस्थान समितीचे सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनायत आणि समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();