टॉप बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज वणीत महाआरोग्य शिबीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे आज 17 संप्टें.2025 पासून वणी उपविभागीय क्षेत्रात "सेवा पंधरवडा" आयोजित करण्यात आला आहे. 

आज वणी शहरात भाजपा महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील हृदयरोग तज्ञ्, दंतरोग तज्ञ्, स्त्रीरोग तज्ञ्, आर्थोपेडीक सर्जन, बालरोग तज्ञ्, मानसोपचार तज्ञ्, त्वचा रोग तज्ञ्, कार्डीओथोरेसिक इत्यादी क्षेत्रातील डॉक्टरांचा सहभाग असून बाजोरिया लॉन वरोरा रोड वणी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत उपचार घेता येणार आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा 'सेवा पंधरवाडा' महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत, दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात वणी शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही भाजपातर्फे देण्यात आली.

या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त जनतेनी घेण्याचं आवाहन ॲड.कुणाल चोरडिया जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();