सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : जिल्हा संघटनेच्या वतीने आज पांढरकवडा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी टायगर सेनेची कार्यकर्ता बैठक उत्साहात पार पडली. विदर्भ अध्यक्ष मा. संतोष कुळमेथे यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीस विदर्भ उपाध्यक्ष मा. रमेशजी धुर्वे यांनी अध्यक्षस्थानी राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मा. बंडू तोडसाम तसेच जिल्हा महासचिव मा. अमोल कुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस ए टी एस विदर्भ संघटिका रंजना आत्राम, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष वैशाली केराम, एटीएस युवाचे उपाध्यक्ष विजय कनाके यांच्यासह ए'टी'एस'चे लहानू सालूरकर, विवेक तोडासे, पुजा वासरीकर, कविता मडावी, रीना ठमके, कमलाकर नेवारे, विना धुर्वे, रूपा कोडापे, किशोर कोवे, संदीप कोवे, दीपा किनाके, माया मानकर, रेखा सलाम तसेच वणी, मारेगाव, आर्णी, घाटंजी आणि पांढरकवडा येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात येऊन आगामी काळात सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
बैठकीत संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांची भूमिका आणि समाजहिताच्या उपक्रमांवर विशेष भर देत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.