टॉप बातम्या

श्री. रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर : ऑनलाईन

वणीदिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक वसंत जिनिंग हॉल येथे पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

सभेच्या प्रास्ताविकात संचालक सुरेश बरडे यांनी संस्थेची प्रगती व सामाजिक सहभाग याबद्दल सविस्तर माहिती दिली.
उपाध्यक्ष मा. विवेकानंद मांडवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी आमसभेचे विषयवाचन केले.

आर्थिक वर्ष 2024-25 चा अहवाल सभेत सादर करण्यात आला. सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा यशस्वीरीत्या पार पडली.

संस्थेची वैशिष्ट्ये :
स्थापना : 1989 (स्व. भय्याजी पामपट्टीवार यांची संकल्पना)
अध्यक्षपद : 2002 पासून अॅड. देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
ऑडिट : स्थापनेपासून सतत ‘अ’ वर्ग
शाखा : 21 शाखा
सभासद : 91,355
ठेवी : ₹873.32 कोटी
नफा : ₹2.97 कोटी
लाभांश : 3% (मंजूर)

कार्यक्रमाची सांगता :
आभार प्रदर्शन संचालक चिंतामण आगलावे यांनी केले, तर सूत्रसंचालन पायल परांडे यांनी केले. सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();