टॉप बातम्या

वनोजा देवी परिसरातील 33 केव्ही उपकेंद्र तत्काळ उभारा-शिवसेनेची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी परिसरात योग्य दाबाने विज पुरवठा होण्यासाठी 33 के.व्ही. उपकेंद्र तातडीने उभारावे अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वात उप अभियंता वीज वितरण कंपनी, मारेगाव यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. 

या उपकेंद्रासाठी २०२३/२४ मध्ये जमीनचे कागदपत्रे देयात आली आहे. त्यानंतर वारंवार शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की, होणार आहे होणार म्हणून. परंतु आजतागायत मुहूर्त निघाला नाही. त्यामुळे या मागणीकडे पुन्हा लक्ष घालण्यासाठी शिवसेनेने निवेदन दिले. 

वाढत्या विजेच्या मागणीमुळे वारंवार खंडीत व कमी दाबाने विज पुरवठा होतो. याचा परिणाम शेती पिकांवर तसेच या परिसरातील उद्योग धंद्यावर होवून व्यावसायिकांना व शेतक-यांना आर्थिक फटका बसतो. यामुळे या परिसरात 33 केव्ही उपकेंद्र तत्काळ होणं गरजेचे आहे.

निवेदनावर अध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्यासह प्रवीण बलकी, प्रशांत भंडारी, गजू भोयर, अमित देवतळे, गणेश धोबे, संजय बलकी, सुधाकर दावे, प्रवीण काळे, पंडित काळे, रुदा सातपुते व महादेव मस्की यांच्या सह्या आहेत. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();