सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : गेल्या काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे. वर्धा नदीच्या तिरावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, आणि तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वर्ष भऱ्याची मेहनत पाण्यात गेली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी मारेगाव भाजप कार्यकर्त्यांनी आज (ता.15) ला तहसिल कार्यालयात निवेदन दिले. हे निवेदन भाजप चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
निवेदन देते वेळी अविनाश लांबट मारेगाव तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.