सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी भारतीय जनता पार्टी च्या वतीने राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता "सेवा पंधरवडा" 2025 या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यामध्ये भव्य महाआरोग्य शिबिर, नमो नेत्रसंजीवनी शिबीर, स्वच्छता अभियान, आयुष्यमान भारत कार्ड अभियान, पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती, एक पेड माँ के नाम अभियान, वोकल फॉर लोकल अभियान, कार्यकर्ता मेळावा, स्वच्छता मोहीम, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती असे आयोजन करण्यात आलेले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसापासून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती आज (ता. 15) दुपारी येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, विजय पिदूरकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, ॲड.कुणाल चोरडिया, ॲड.निलेश चौधरी, महादेव खाडे, यासह भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.