टॉप बातम्या

झरी-जामणी येथे संविधानिक जन आक्रोश मोर्चा!

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी-जामणी : अनुसूचित जमाती समाज संघटनांच्या वतीने येत्या 23 सप्टेंबर 2025 रोजी झरी-जामणी येथे “संविधानिक जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार कार्यालय व पाटण पोलीस स्टेशन यांना जनसुरक्षा कायद्याअंतर्गत पूर्वसूचना देऊन मोर्चा परवानगी मागण्यात आली आहे.

संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर वारंवार इतर समाजाकडून मागण्या होत असल्यामुळे समाजातील 45 घटक जातींवर अन्याय होत असून असंतोषाची भावना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाद्वारे समाजाच्या विविध मागण्या राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तहसील प्रशासनामार्फत पोहोचविण्यात येणार आहेत.

मोर्चा शांततेत व संविधानिक मार्गाने पार पाडण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना सर्व सकल अनुसूचित जमाती कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();