टॉप बातम्या

अखेर त्या वादग्रस्त निर्णयाविरोधात ठराव मंजूर, ग्रामपंचायतने दिली होती खासगी कंपनीला जमीन लीजवर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : चोपण येथील एफ क्लासची जमीन एका खासगी कंपनीला सौर ऊर्जेसाठी देण्यासाठी ग्रामपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. याला गावातील नागरिकांनी विरोध करीत तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर या विरोधात ग्रामवासियांनी ठराव करून घेत खासगी कंपनीला दिलेला ठराव नामंजूर रद्द केला.
          
चोपण येथे एफ क्लासची 8 हेक्टर 94 आर एवढी जमीन आहे. यापैकी 2 एकर जमीन ही स्मशानभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेली असून उर्वरित जमीन ही सौर ऊर्जा कृषी वाहिनी प्रकल्पासाठी एका खासगी कंपनीला 30 वर्षासाठी लीजवर देण्यात आली होती. जेव्हा या प्रकल्पावर काम करणारे चोपण येथील जमीन मोजण्यासाठी आले तेव्हा चोपण येथील नागरिकांना याविषयी माहिती झाली. यामुळे गावामध्ये जनक्षोभ उसळला. अनेकांनी या प्रकल्पला विरोध केल्याने गावातील गंगाराम महाराज मंदिरामध्ये दत्तूजी खीरटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यामध्ये अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत या प्रकल्पला विरोध दर्शवीला.तहसील कार्यालय आणि पंचायत समितीला तक्रारही दाखल करण्यात आली होती. 

         
चोपण येथील एकमेव खुली असलेली जागा जीला गायरान म्हणून गावातील जनावरांना चरण्यासाठी तिचा वापर होतो. तसेच येथे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तलाव खोदलेला आहे. वनविभागातर्फे वृक्षारोपण करण्यासाठी हिच एकमेव जागा उपलब्ध आहे. यापूर्वीही सामाजिक वनीकरण अंतर्गत येथे वृक्षारोपण करण्यात आलेले होते.याविरोधात गावामध्ये वाढत असलेला विरोध लक्षात घेता ग्रामपंचायतने दि. 13/4/2026 ला प्रशासक शारदा संजय गोहोकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून दिलेला ठराव रद्द करण्याचा ठराव घेण्यात येऊन तो पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. या ठरावाला विरोध करून त्याविरोधात ठराव रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();