टॉप बातम्या

मारेगावात वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११७ वी ग्रामजयंती उत्साहात साजरी होणार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : श्री गुरुदेव सेवा मंडळ, मारेगाव तालुका यांच्या वतीने वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी हनुमान मंदिर परिसरात, नगरपंचायत कार्यालयाजवळ, मारेगाव येथे पार पडणार आहे.

या निमित्ताने प्रार्थना, प्रचार-प्रसार व प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ४.३० वाजता परिसर स्वच्छतेने होणार असून त्यानंतर सामुदायिक ध्यान आयोजित केले जाईल. सकाळी ६ ते १२ वाजेदरम्यान ग्रामगीता ग्रंथ पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये शहरातून भव्य मिरवणूक व नगर प्रदक्षिणा करण्यात येईल. दुपारी १ वाजता भोजन व्यवस्था करण्यात येणार असून विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रबोधनपर विचार मांडले जाणार आहेत. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे.

तसेच रात्री ८ वाजता ह.भ.प. सौ. जयश्रीताई गावंडे (रा. हळदी, ता. चिपूर, जि. चंद्रपूर) यांचे जाहीर कीर्तन होणार असून त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भजन मंडळांना सन्मानित करण्यात येणार असून इच्छुकांनी आपली नावे नोंदवावीत, असेही आयोजकांनी कळविले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();