सह्याद्री चौफेर | नंदकिशोर मस्के
महागाव : तालुक्यातील सेवानगर (कासारबेहळ) ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्तव्यदक्ष ग्रामसेवक पी. बी. मस्के यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावातील लाभार्थ्यांना योजना मिळवून दिली. त्यांच्या या कार्यामुळे कासारबेहळ गावाने तालुक्यात एक नंबरचा क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब यांच्या हस्ते ग्रामसेवक मस्के यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मस्के यांनी केलेल्या निष्ठावान कार्यामुळे गावाचा विकास साधला असल्याचे या वेळी गौरवोद्गार काढण्यात आले.