टॉप बातम्या

शिव महोत्सव समितीचे अध्यक्षपदी अनंत मांडवकर यांची निवड


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : बळीराजा व्याख्यानमालेची आयोजक संस्था अर्थात शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मारेगाव येथील आघाडीचे व्यावसायिक अनंत मांडवकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

शिव महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी होते. त्यानंतर मा. डॉ. रमेश सपाट दुसरे अध्यक्ष, तर मा. शहाबुद्दीन अजाणी तिसरे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गत चार वर्षांपासून समितीची जबाबदारी सांभाळल्यानंतर श्री. अजाणी यांनी पदाचा कार्यभार नवीन नेतृत्वाकडे सोपविला आहे.

नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत, मावळते अध्यक्ष मा. अजाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सविस्तर चर्चेनंतर मा. अनंत मांडवकर यांच्या नावाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या बैठकीस निमंत्रक कृष्णदेव विधाते, सुरेंद्र घागे, विलास शेरकी, वसंत थेटे, संजय गोडे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

मा. अनंत मांडवकर यांचे शिक्षण बी.ई. (सिव्हिल) असून, ते अमन ट्रेडर्स या मारेगावमधील नामांकित बिल्डिंग मटेरियल सप्लायर प्रतिष्ठानचे संचालक आहेत. तसेच मराठा सेवा संघाच्या अमरावती विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे.

मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानत, पुढेही सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छाही दिल्या. तर अनंत मांडवकर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल समितीचे आभार मानून, बळीराजा व्याख्यानमाला अधिक प्रभावी व यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

शिव महोत्सव समितीने शहाबुद्दीन अजाणी यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, नवीन अध्यक्ष म्हणून  अनंत मांडवकर यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();