सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी रोशन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वनोजा ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी शनिवारी दि.६ सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
सरपंचा डीमन टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत अध्यक्ष पदाच्या नावावर एक मत झाले. या सभेत गावातील नागरिक रोशन शिंदे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड होताच उपस्थित ग्रामस्थांनी नूतन अध्यक्ष रोशन शिंदे यांचे अभिनंदन केले.
यावेळी अधिकारी (ग्रामसेवक) सय्यद शेख, उपसरपंच प्रशांत भंडारी, सूचक अमोल गेडाम, अनुमोदन बंडू टोंगे आदीसह समस्त गावकरी उपस्थित होते.