सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : यवतमाळ जिल्ह्यासह वणी तालुक्यातील प्रसिद्ध गणपती बाबापूर येथील नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. येथील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह वणी मारेगाव झरी-जामणी तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी असते.
तालुक्यात गणेशोत्सव मोठया उत्सहात साजरा होत असताना बाबापूर येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतेय. भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडीया यांनी सुद्धा गुरुवारी हजेरी लावली व बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर संस्थेतर्फे ॲड. कुणाल चोरडिया यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या भेटी दरम्यान कुणाल चोरडिया यांच्या सह मित्र परिवार होते.