सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज ८ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे १:५५ ते २:३० वाजेच्या दरम्यान मुर्धोनी परिसरात गस्त घालत असताना, पोलिसांनी विलास रमेश आडे (वय ३० वर्षे, रा. वाघदरा) आणि तुलशिराम भगवान काकडे (वय ३२ वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी) यांना अवैध रेती वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर झालेल्या कारवाईने रेती तस्करात खळबळ उडाली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे १:५५ ते २:३० वाजेच्या दरम्यान मुर्धोनी परिसरात गस्त घालत असताना, पोलिसांनी घटनास्थळावरून MHINDRA YUVO TECH + 575 DI कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (ज्यावर आरटीओ नंबर नाही, चेसिस/इंजिन नंबर 006520513V01 आणि ट्रॉलीचा चेसिस नंबर NKI/2005/25) आणि १ ब्रास रेती असा एकूण ६,५६,००० (सहा लाख छप्पन्न हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी शासनाची कोणतीही परवानगी न घेता रेती चोरून नेत असताना मिळून आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(2), ३(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस स्टेशन वणी हे करत आहेत.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पो.का. श्याम, पो.का. विकास, पो.का. वसीम यांनी केली.