सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास सोमनाळा फाटा जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात प्रविण बंडु मेश्राम (वय 42 वर्षे, व्यवसाय मनुरी, रा. राजुर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले तीन मजूर जखमी झाले आहेत.
फिर्यादी प्रविण मेश्राम व त्यांचे सोबती विटा भरलेला ट्रक (क्र. MH31 GB 3037) घेऊन पाटणबोरी येथे जाऊन विटा खाली करून परत येत असताना हा अपघात झाला. घटनास्थळी पोहोचल्यावर असे समजले की, ट्रक (क्र. MH46 AF 9483) चा चालकाने निष्काळजीपणे रस्त्यावर ट्रक उभा करून ठेवला होता. तसेच ट्रकचे इंडिकेटरही सुरू केले नव्हते. अंधार असल्याने समोरून येणारा वाहनचालक ट्रकला धडकला व अपघात घडून जखमी झाले.
सदर अपघाताची नोंद प्रविण मेश्राम यांच्या डी.डी. मोमो बयानावरून करण्यात आली असून ट्रक क्र. MH46 AF 9483 च्या पालकाविरुद्ध कलम 285, 125(a), 125(b) भा.नं.सं. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस ठाणे वणी येथील हेड कॉन्स्टेबल अविनाश चिकराम (HC-12) करीत आहेत.