टॉप बातम्या

वणी येथे जागतिक माहिती अधिकार दिन साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरामध्ये सन २००९ पासून आर.टी.आय जिल्हा संघटक दादाजी पोटे यांचे नेतृत्वात आरटीआय क्लबचे शाखा वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, येथे कार्यरत आहे. आज दिनांक २८ सप्टेंबर २००५ रोजी क्लबचे वतीने वणी येथे श्री रंगनाथ स्वामी मंदिराचे प्रांगणामध्ये जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. 
यावेळी आरटीआय क्लबचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जागतिक दिनाच्या निमित्ताने वणी येथील आरटीआयचे कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष विजय दिघे यांनी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन केले असून बोलताना त्यांनी म्हटले की, पोटे साहेबा सारखे हजार कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजे. त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी अभिमानाने टाळ्यांचा गजर केला.
     
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात दिनांक १२/१०/२००५ पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीकरिता व प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. 
दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर "माहिती अधिकार दिन (RTI Day)" म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आरटीआय क्लब शाखा वणी च्या वतीने जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पि.के. टोंगे, प्रशांत जुमनाके (RTI सचिव), अविनाश बुधकोंडावार, दिनकर पारखी, जलील शेख, बापूराव गेडाम, योगेश तेजे, बबन काकडे तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();