सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज सकाळी सुमारे ६:१५ वाजता वणी आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक MH 40 AQ 6062 ने शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ग्राम बोर्डा येथे जात असताना एक गंभीर प्रकार घडला.
विरकुंड ते बोर्डा मार्गावर शेताजवळील रस्त्यावर समोरून आलेल्या मोटरसायकल चालकाने बसला अडथळा आणला. बस चालकाने रस्ता दिल्यानंतरही मोटरसायकल चालकाने “फुकटची नोकरी लागली” असे म्हणत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने बस चालकाचा कॉलर पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.
घडलेल्या प्रकारात बसचा वाहक संजय नान्ने मदतीला धावून आल्यावर, मोटरसायकल चालकाने लाकडी काठीने बस चालकाच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली.
सदर मोटरसायकल क्रमांक MH 29 BW 8150 असून, चालकाचे नाव पायघन, रा. बोर्डा असे आहे. त्याने शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.