टॉप बातम्या

मारेगाव येथे शनिवारी सभासद मेळावा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावआंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मारेगाव यांच्या वतीने सभासद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता स्थानिक शेतकरी सुविधा केंद्र येथे पार पडणार आहे.
या सभासद मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदासजी काळे असतील. तर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजूदास जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यासाठी उपविभागातील मान्यवर तसेच सभासदांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक परिक्षित एकरे, सुधीर दामले, हरीशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, अॅड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अड्डेलराव, अरविंद ठाकरे, सुनील देठे, छायाताई ठाकुरवार, निमाताई जिवणे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे व शाखा व्यवस्थापक संतोष घुगुल यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();