टॉप बातम्या

माधव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्य वृध्दाश्रमात वस्ञदान


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते माधवराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्य आधार फाउंडेशन मारेगाव च्या वतीने श्री सद्गुरु बाजीराव महाराज वृध्दाश्रम वणी येथे असलेल्या माता पित्यासमान जेष्ठ वृध्द नागरिकांना साडी,पातळ,धोतर इत्यादींचे वस्ञदान व फळ वाटप करण्यात आले.
      
पारंपारिक वाढदिवस पध्दतीला फाटा देत गरजुंना आवश्यक वस्तू देऊन वाढदिवस साजरा केल्याने वृध्दांच्या चेहऱ्यावर आज हसू व समाधान पहायला मिळाले. आज खऱ्या गरजवंत वृध्दांना वस्ञदान व फलाहार दिल्याने आपल्या आई वडीलाची सेवा करण्याचा आनंद मिळाला असे माधव कोहळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना म्हटले.
   
यावेळी माधव कोहळे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरणुले,सुभाष लसंते,प्रविण राऊत, बाजीराव महाराज वृध्दाश्रम संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर,नामदेव सेलवडे,सौ.नंदाताई सेलवडे,सौ.राधिका कोहळे,कु.शिवानी कोहळे इत्यादी उपस्थित होते.सुञसंचालन व आभार श्री.सुहास नांदेकर यांनी केले.
    
त्यानंतर लक्ष्मी हाॕटेल मारेगाव येथे सायंकाळी पाच वाजता माधव कोहळे यांच्या वाढदिवसाबद्दल केक कापुन व पुष्पगुच्छ देऊन काॕमेडी कलाकार व रिलस्टार विलास झट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत माधव कोहळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जितेश राऊत,विकास लसंते,पवन नेहारे,पवन वारंजे यांचेसह अनेकजन हजर होते.
      
सायंकाळी शासकीय विश्रामगृह मारेगाव येथेही एक कार्यक्रम झाला.त्यावेळी भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांनी पुष्पगुच्छ देऊन व केक कापुन माधव कोहळे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अमोल गुरनुले,जितेश राऊत,विकास लसंते,सुभाष लसंते,प्रविण राऊत इत्यादी हजर होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();