टॉप बातम्या

जन सुरक्षा विधेयक रद्द करा;शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. बुधवारी शिवसेना (उबाठा) तालुका संघटनेच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधी कायदा रद्द करण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून मारेगाव चे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनादरम्यान सरकार च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले.

हा जुलमी कायदा असून लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

निवेदन देताना तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, उप तालुका प्रमुख विजय अवताडे, उप तालुका प्रमुख देवा बोबडे, उपतालुका प्र.जानराव पिपळकर,संपर्क प्रमुख सचिन पचारे, विधानसभा संघटक मधुकर वरडकर , नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, अभय चौधरी, शरद ताजणे, विभाग प्र.गुरुदास घोटेकार, विभाग प्र.मनोज वादाफळे,मनोज मत्ते,पांडुरंग ढुमणे,अविनाश भाजपाले,समाधान पवार,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();