सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आदिवासी समाजाच्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची धक्कादायक प्रकार मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे घडला आहे. या गंभीर घटनेप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात दोघां भावा विरोधात अनुसूचित जाती -जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
दिनांक 7 सप्टेंबर रोजी साडेबारा वाजताच्या सुमारास राजु सुरपाम व विवेक देवाळकर यांनी गावातील चौकामध्ये दोघां मध्ये मारहाण केली मात्र प्रकरण शांत होताच.विवेक देवाळकर यांनी आपल्या मोठ्या भावाला बोलवून राजु सुरपाम च्या घरी जाऊन पुन्हा बेदम मारहाण केली मारहाणीत बहिण व आई झगडा सोडविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली.
फिर्यादी मुलीची आईने आरोपी विवेक देवाळकर व कपिल देवाळकर यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ आरोपींनी केली.
पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी फिर्यादीच्या दाखल तक्रारीवरून सबंधीत कपिल देवाळकर व विवेक देवाळकर यांच्यावर अनुसुचित जाती जमाती व इतर कल्मान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत