टॉप बातम्या

शिवसेना (उबाठा) चे "जनसुरक्षा काळा कायदा" विरोधात निषेध आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
    
वणी : पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार राज्यभर 10 जुलै रोजी जनसूरक्षा कायदा 2025 विधेयक पारित केले.हा कायदा लोकशाही संपुष्टात हाणून देशात हुकूमशाही बळजबरीने लादण्याचा सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर निषेध आंदोलने करण्याचा आदेश दिला, त्या आदेशान्वये वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर, यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख संजय निखाडे, यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना जनसुरक्षा काळा कायदा रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे. 

त्या अनुषंगाने तहसील वणी समोर काळ्या कायद्याविरोधात व सरकार विरोधात तुफान निदर्शने देऊन निषेध व्यक्त केला आणि किरणताई देरकर, संजय निखाडे दिलीप काकडे यांनी हा सामान्य जनतेवर हुकूमशाही लादणारा लोकशाही संपुष्टात आणणारा काळा कायदा रद्द न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण जिल्यात करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांनी सरकारला दिला आहे.

यावेळी महिला पदाधिकारी सौ किरणताई देरकर, उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, तालुका प्रमुख संतोष कुचनकर, जिल्हा समन्व्यक सुधीर थेरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे,विधानसभा संघटक रवि बोढेकर, शहर प्रमुख विनोद ढुमणे, मा.दिलिप काकडे मा.जि.प. सदस्य यवतमाळ, प्रसिद्ध तालुका प्रमुख सुरेश शेंडे, युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे, संभा मते, संजय देठे, अजय चन्ने, मनीष बत्रा, साबीर भाई शेख, स्वप्निल ताजने , राहुल कोलते, राजू गोलाईत, प्रकाश कराड, राजू पारोधी,सौ सुरेखाताई ढेंगळे, सौ गिताताई उपरे व शिवसेना उबाठाचे शेकडो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();