टॉप बातम्या

भर दिवसा, भर चौकात थार कारच्या काचा फोडल्या


• पोलीसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, मात्र तो निघाला...

सह्याद्री चौफेर : ऑनलाईन

वणी : भर दिवसा एका थार कारला दगड मारून काचा फोडल्या. ही खळबजनक घटना शनिवारी दि. 27ऑगस्ट ला दुपारी टिळक चौकात घडली असून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

वणी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या टिळक चौकात एका तरुणाने चक्क! उभी असलेली थार कारची दगड मारून काचा फोडून कारचे मोठे नुकसान केले. या दरम्यान काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालेत. दि. 27 ऑगस्ट रोज शनिवारला नागपूर येथील अभिषेक राजू ठोबळे हे न्यायालयीन कामासाठी वणीत आले असता टिळक चौक येथे त्यांनी कार उभी करून ठेवली होती. अशातच उभ्या असलेल्या कारच्या काचा दगड मारून फोडत असताना ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धक्कादायक थरार अनुभवला. या दरम्यान भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व त्या तरुणाला लगेंच ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस तपासात तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नये,यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post