सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
सर्व पक्षीय एकीकडे आपल्या पक्षाची ताकत वाढवत, मोर्चे बांधणी सुरु केली असताना दुसरीकडे पक्षाला धक्का देण्याची बातमी समोर आली आहे. बहुजन चळवळीतील कार्यकर्ता तथा उबाठा गटाचे प्रवीण खानझोडे यांची शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून विविध चर्चेला उधाण आले आहे.
ह्या कारणास्तव शिवसेनाला "जय महाराष्ट्र"
मागील काही वर्षांपासून ते पक्षात कार्यरत होते. परंतु त्यांच्या काही खाजगी कामामुळे खानझोडे ह्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आज रोजी घेतला आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाचा व संघटनात्मक माझा कुठलाही संबंध नाही. शिवसेना पक्षातील सर्व नेते व मित्रपरिवार व सहकारी हे मला जाणते आहे व त्याच्या सोबत आज रोजी माझे आपुलकीचे व स्नेहाचे संबंध आहे व राहतील.
पुढे असंही म्हटल की, आज पासून शिवसेना (उबाठा) गटाशी माझा कुठलाही राजकीय संबंध नाही, असं स्पष्ट सांगितले असून त्यांच्या अशा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरचा"जय महाराष्ट्र" त्यांनी घेतला. अशी माहिती खुद प्रवीण खानझोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.