सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील वागदरा येथे चोरट्याने तीन दुचाकी चोरून नेल्या. शहर आणि शहरालगत असलेल्या गाव परिसरात सतत चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
अधिक माहिती अशी की, अतुल वाभीटकर यांच्या येथे चोरीची घटना घडली. चोरट्याने त्यांची मोटारसायकल क्र. (एम एच 29 ए एस 572) ही चोरून नेली. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे वाभीटकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तसेच स्वस्तिक नगर येथील घनश्याम इंगोले यांच्या घराचे कंपाउंड वरून चढत चोरटे आत घुसले. लोखंडी गेट चा आतील कडी कोंडा तोडून पोर्च मध्ये उभी असलेली दुचाकी क्र. (एम एच 34 डी जे 3828) व (एम एच 43 एक्स 8430) चोरपावलांनी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु एका गाडीत पेट्रोल ड्राय होते तर, दुसऱ्या गाडीचे पेट्रोल लॉक होते, त्यामुळे त्यांनी शंभर ते दीडशे मिटर अंतरावर त्या ढकलत नेत सोडून दिल्या. हा डाव फसल्याने वरील नमूद घटना सोमवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे दिसत आहे. आता तर घराच्या आवारात ठेवलेली वाहनेसुद्धा सुरक्षित राहिले नसल्याने नगर वासियां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत.