टॉप बातम्या

वणी शहरात रेसिंग करणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांची कारवाई; पालकांनाही इशारा

सह्याद्री चौफेर : ऑनलाईन

वणी : शहरात काही युवक मुख्य रस्त्यांवर रेसिंग बाईक चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याची तक्रारी मोटर साईकल क्रमांका सह वणी 
 पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शहरात गस्त वाढवली होती.

दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी गस्तीदरम्यान, पोलिसांनी जैन ले-आऊट परिसरात प्राप्त तक्रारीतील 
MH 29CL1790 आणि MH29CG8758 क्रमांकाच्या दोन रेसिंग बाईक व चालक अनुक्रमे सतीश रामदास हिवरकर आणि सुखदेव सुनील भोयर (दोघेही रा. गणेशपूर/छोरिया ले-आऊट, वणी) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) किंवा इतर आवश्यक कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली.

वाहतूक शाखेमार्फत दंड:

• MH29CL1790: 12,750 रुपये दंड
• MH29CG8758: 2,750 रुपये दंड

वणी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शहरात किंवा परिसरात कोणीही रेसिंग (RASH DRIVING) करू नये. तसेच, पालकांनी आपल्या मुलांना रेसिंगसाठी वाहने देऊ नयेत. अन्यथा, कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.
Previous Post Next Post