सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस वणीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व आम्हाला केवळ राजकारणासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी झटण्याची प्रेरणा देते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आमच्यासाठी नव्या प्रेरणेचा सोहळा आहे. असे प्रतिपादन यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले.
संजय खाडे पुढे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहे. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष वणी विधानसभा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून ते लोकसेवेचे माध्यम आहे, हा त्यांचा विचार आम्हाला सतत प्रेरणा देतो. त्यामुळे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सदैव लोक कल्याणाकरता झटतात. असे ही ते म्हणाले
ग्रामीण रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. कार्यक्रमाला डॉ. शंकर वऱ्हाटे, प्रमोद लोणारे, ओम ठाकूर, राजू अंकितवार, अशोक चिकटे, ज्ञानेश्वर बोनगीरवार, ईश्वर खाडे, धनंजय खाडे, प्रशांत गोहकर, उत्तम गेडाम, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, महादेव दोडके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.