सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे वतीने, तालुका कृषि अधिकारी वणी, मा.दिलीप राऊत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील विविध योजनांचा प्रचार व प्रसिध्दी करीता शेतकरी यांना मार्गदर्शन व माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.
एम.आर.पत्रे, सहायक कृषी अधिकारी, यांनी कृषि विभागातील विविध योजना MREGS फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना, तुती लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत शेततळे, यांत्रिकीकरण, PMFME योजना ईत्यादी सर्व योजनांची माहिती या वेळी उपस्थित शेतकरी बाधवांना देऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकरी बाधवांनी घ्यावा तसेच गावातील 100 % शेतकरी बांधवानी तात्काळ फार्मर.आय.डी व खरीप हंगामातील पिकाकरीता पिक विमा काढणे करीता आवाहन करण्यात आले.
डी.आर.बरडे, सहायक कृषी अधिकारी, यांनी पारंपरिक शेतीला कृषि तंत्रज्ञानाची जोड देणे व शेती पुरक व्यवसाय करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले सोबतच खरीप हंगामातील कापूस, तूर व सोयाबीन पिकांवरील कीड/रोग ओळख व एकात्मिक कीड व रोगाचे व्यवस्थापन बाबत चर्चा व मार्गदर्शन केले. एस.एम.घुगे, सहायक कृषी अधिकारी, यांनी तुती लागवड योजना व बांबू लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत चर्चा व मार्गदर्शन केले.
मा.सरपंच सौ.प्रियंका प्रमोद कोल्हे यांचे हस्ते दरदिवशी फवारणी करणा-या शेतमजुरास फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले व एम.आर.पत्रे, सहायक कृषी अधिकारी, यांनी किटकनाशके खरेदी करताना तसेच फवारणी करताना विषबाधा होऊ नये या करीता घ्यावयाची काळजी तसेच विषबाधा झाल्यास प्रथम उपचार या बाबत मार्गशर्दन करुन प्रात्याक्षिक करुन दाखविले.
सदर समाधान शिबिर करीता गावचे सरपंच सौ.प्रियंका प्रमोद कोल्हे, उपसरपंच पद्माकर देरकर, पोलिस पाटील प्रदीप बलकी, राशन दुकानदार सुधाकर तुराणकर, महसुल अधिकारी व ग्राम पंचायत अधिकारी, कृषि अधिकारी, जि.प.प्रा.शाळा, शिक्षकवृंद, आरोग्य विभाग अधिकरी/कर्मचारी तसेच गावातील शेतकरी बांधव व शालेय विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते व सर्व शेतकरी बांधवांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कतरे ग्राम महसूल अधिकारी, बोरगाव (मे) यांनी केले व उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले.