सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील नगरसेवक जितेंद्र नगराळे यांचे कार ला अपघात झाला, यात नगरसेवक हे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना (ता. 4) रोजी रात्री 11.30 वाजता दरम्यान वणी - गणेशपूर रोड लगत पुला नजीक घडली.
वणी तालुक्यातील मुकुटबन कायर रोडवर असलेल्या एका हॉटेल मधून आपल्या सवंगडीचा जन्मदिन साजरा करून इको स्पोर्ट या चारचाकी वाहणाने ते मारेगाव स्वगृही निघाले. वार्ड क्रमांक 17 स्थित नगरसेवक हे स्वतः वाहन चलवित असतांना कारचे नियंत्रण सुटून गणेशपूर रोड लगत निर्गुडा नदी शेजारी असलेल्या पुलाच्या जवळ कार दोनदा उलटली, यात मारेगावचे नगरसेवक जितेंद्र नगराळे जखमी झाले.
ताबडतोब वणीहुन नागपूर येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले असून त्यांच्या डोक्याला साधारण तर छातीला जबर मार असल्याची माहिती असून तूर्तास वैद्यकीय नियंत्रनेत अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे समजते.