सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दि. 5 ऑगस्ट 2025 रोज सोमवार ला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानातुन लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप आमदार संजय देरकर वणी विधानसभा, उपविभागीय अधिकारी, नितीनकुमार हिंगोले, नगराध्यक्ष डॉ मनिष मस्के, तहसीलदार उत्तम निलावाड, मारोती गौकार, अविनाश लांबट, पुरुषोत्तम बुटे, विशाल किन्हेकर व विविध विभागाचे अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत विविध प्रकारचे वितरित केले.
मान्यवरांच्या हस्ते शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना विविध प्रमाणपत्रे यावेळी वाटप करण्यात आले.
या सप्ताहातून नागरिकांना शासनाच्या योजनांची, त्यासंबधी कागदपत्रे, शासकीय कागदपत्रे, शालेय कागदपत्रे ईत्यादी सर्व माहिती उपस्थितांना देऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार महेश रामगुंडे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी कांडाळकर यांनी केले व उपस्थित सर्व बांधवांचे कांबळे मॅडम यांनी आभार मानले.