Top News

युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा पाठपुरावा फळाला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी ते मुकुटबन मार्गावरील चिखलगाव टी पॉईंट ते घोंसा फाटा या दरम्यान रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती.

सदर मार्ग हा राज्य महामार्ग क्र. 319 असून हायब्रीड अ‍ॅन्युईटी मोड (HAM) अंतर्गत तो महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (MSIDC) यांच्याकडे हस्तांतरित असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले.

यानंतर अजिंक्य शेंडे यांनी थेट MSIDC अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावर खड्डे बुजवण्याची तातडीची मागणी केली. या मागणीची MSIDC प्रशासनाने तत्काळ दखल घेत चिखलगाव टी पॉईंट ते घोंसा फाटा दरम्यानच्या मार्गावरील धोकादायक खड्डे मुरुम व गिट्टी टाकून बुजवले.

युवासेनेच्या या तत्काळ आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापुढे या मार्गावर कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती व्हावी यासाठीही युवासेना पाठपुरावा करणार आहे.


---
Previous Post Next Post