टॉप बातम्या

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्य वणी शहरात विविध कार्यकमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीवणी शहरात ईद मिलादुन्नबी (स.अ.) हजरत मोहम्मद पैगंबर यांचा 1500 वा जन्मदिवस म्हणजेच 'ईद मिलाद' या निमित्ताने शहरात ईद मिलाद शहर कमेटी द्वारा अनेक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27-08-2025 ते दिनांक 05-09-2025 पर्यंत करण्यांत येत आहे.

यामध्ये हजरत मौलाना मुफ्ती जुबेर रजा साहाब जामा मस्जीद, हजरत मौलाना नजीर साहब मदिना मस्जीद, हजरत मौलाना, मुहीब रजा कादरी हयात मस्जीद, जुनैद रजा अजहरी नगीना मस्जीद, जेरे कयादत हसनैन आरिफी साहब हयात मस्जीद यांचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर धार्मिक प्रवचन राहतील

त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प (रक्तदान शिबीर), हिजामा (कपींग बेरेपी) कॅम्प दोन दिवस, लहान मुलं-मुलांची वक्तृत्व स्पर्धा यांचे धार्मिक प्रवचन महिला करिता आलेम उजमा फोतेमा रिजविया यांचे धार्मिक प्रवचन, जामा मस्जीद तर्फे गरजू लोकांना 100 ब्लॅकेट बाटप, ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळांचे वाटप, लहान मुलं-मुलींची हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रवचन व महाप्रसाद , कुरान पाठण,धार्मिक प्रवचन इत्यादि भरगच्च कार्यकम होणार आहे तसेच मदीना मस्जीद, अक्सा मस्जीद येथे ईद मिलाद निमित्य अनेक कार्यकम होणार आहे. शहरातील मुख्य मार्गावर स्वागत कमान व सजावट करण्यात येणार आहे.

दि.05-09-2025 रोज शुकवारला सकाळी 10:30 वा. भव्य मिरवणूक निघेल मोमिनपूरा, पंचशील नगर, काजीपूरा, लालपुलिया, जामा मस्जीद, शास्त्री नगर, इस्लामपूरा, रजा नगर, दिपक चौपाटी येथील लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. हे भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने होऊन मोमीनपुरा येथे पोहोचेल तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन होवून कार्यकमाची समाप्ती होईल.
Previous Post Next Post