सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील कुरई येथील महिलेचा विहिरीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
अविता विजय पुरसटकार (अंदाजे वय 33) असे मृतक महिलेचे नाव आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी सौ. अविता ह्या शेतात कामाकरिता गेली होती.दुपारी 2.30 वाजता च्या दरम्यान,शेतात मधील असलेल्या विहिरीमध्ये तिचा पाण्यात पाण्यामध्ये मृतदेह आढळून आला. स्थानिक चौकशीत मृत्यू चे कारण समजू शकले नाही. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनेच्या ठिकाणी पोहचले. व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक अविता ह्यांच्या पाठीमागे पती, तीन मुली व सासू असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहे.