‘भारत बंद’ पाठोपाठ आज ‘महाराष्ट्र बंद’... वणीत मद्य विक्रेता संघाकडून 'लाक्षनिय बंद’

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : 10 टक्के वॅट हटावण्यासाठी, 150 टक्के ड्युटी वाढ विरोधात, दरवर्षी 15 टक्के फी वाढ थांबविण्यासाठी आज सोमवारी राज्यासह वणीत परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहेत. हा एक दिवशीय लाक्षणीय बंद पुकारत वणी उपविभागीय अधिकारी यांना मद्य विक्रेता संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वी देशभरातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी 9 जुलै 2025 रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आता आज 14 जुलैला ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असताना राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच आहार संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. 

त्यामुळे आज सोमवारी वणी मारेगाव व झरी रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार व्यवसाय धारकांकडून लाक्षनिय बंद पुकारण्यात आला आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मद्य विक्रेता संघाच्या वतीने वणी उपविभागात 'महाराष्ट्र बंद’ ला पाठिंबा देत आज कळकळीत बंद पाळला आहे. यावेळी वणी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार इंगोले यांना निवेदन देऊन सरकार च्या अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात चर्चा केली. त्यानंतर वणी स्टेशनलाही निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मद्य विक्रेता आणि असंख्य हॉटेल चालक तथा कुक, वेटर कामगार उपस्थित होते.


Previous Post Next Post