मोबाईल हिसकावून पळवून घेवून जाणाऱ्या तिन गुन्हेगारास वणी पोलीसांनी केले जेरबंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दिनांक ११/०७/२०२५ रोजी तक्रारदार नामे विकास पुरूषोत्तम ढेंगळे, वय ४२ वर्षे, रा. महादेव नगर चिखलगाव हे शिवाजी गार्डन चौक वणी येथे मोबाईलवर बोलत मोटर सायकलवर बसून असतांना त्यांच्या मागून मोटर सायकलवर ट्रिपल सिट अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील तिन मुले भरधाव वेगाने येवून, फिर्यादीचे हातातील मोबाईल VIVO कंपनीचा किंमत १८,०००/- रूपये असा हिसकावून घेवून वेगाने पळून गेले. आरोपीतांनी मोटर सायकल क्रमांक MH 29 B 0091 व त्या नंबर प्लेट वरील सिरीज B नंतर खोडलेले असल्याचे फिर्यादीने त्यांच्या तक्रारीत सांगीतले होते.

सदर गुन्हयाची तकार पो.स्टे.ला प्राप्त होताच, चोरीस गेलेल्या मोबाईल आणि आरोपी व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकलचा MH 29 B 0091 शोध घेत असतांना, मोटर सायकल MH 29 BL 0091 बाबत माहीती प्राप्त केली असता होन्डा यूनिकॉर्न मोटर सायकल MH 29 BL 0091 चा शोध घेतला असता सदर मोटर सायकल ताबा असलेला मयूर गजानन बत्तुलवार, वय २२ वर्षे, रा. शिवनेरी चौक वणी याचा शोध घेवून, आरोपीने गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यात त्याची ताब्यातील मोटर सायकल MH 29 BL 0091 ने त्याचे मित्र नामे महेताब ईल्ताब शहा, वय २४ वर्षे, रा. गोकूल नगर वणी आणि प्रद्युम्न उर्फ बॉबी किष्णा कुरेकार, वय २२ वर्षे, रा. साई मंदीर चौक वणी असे तिघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे तिन्ही आरोपी यांना ताब्यात घेवून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल क. MH 29 BL 0091 कि.अं. ५०,०००/- रूपये आणि गुन्ह्यात फिर्यादी कडून हिसकावून नेलेला VIVO कंपनीचा अॅडरॉईड मोबाईल कि. अं. १८,०००/- रूपये असा जप्त करण्यात आला. तसेच अटक आरोपीतांना इतर मोबाईल चोरीचे गुन्हयात सहभाग आहे काय याबाबत विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता, आरोपींनी अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र नंतर आरोपी महेताब ईल्ताब शहा, वय २३ वर्षे, रा. गोकूल नगर वणी याने वेगवेगळया घटनास्थळावरून १) सॅमसंग कंपनीचा अॅडरॉईड मोबाईल फोन अं.कि. १५०००/- रूपये आणि २) रिअल मी कंपनीचा अॅडरॉईड मोबाईल फोन अं.कि. १५०००/- असे दोन मोबाईल आरोपीचे घरून जप्त करण्यात आलेले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, अपर पोलीस अधिक्षक थोरात साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी पथकातील पो.उप.नि. धिरज गुल्हाने, पोहेकॉ. अमोल दांडगे, पो.कॉ. मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी पार पाडली.
Previous Post Next Post