सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अडकोली (ता.झरी) येथील आई माऊली देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर आणि ग्रामपंचायत भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी करण्यात यावी, अशा आशयचे निवेदन आदिवासी विकास मंत्री ना प्रा अशोक उईके यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे वणी येथे दि. 13 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळ्यानिमित्त आले असता अडकोली तालुका झरी जामणी येथील ग्रामस्थांनी त्यांना निवेदन देऊन आई माऊलीच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची आणि अडकोली ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अडकोली येथे खूप वर्ष जुने माता मंदिर असून सदर या मंदिराचे ग्रामपंचायत कार्यालयात नोंद आहे. तसा नमुना आठ-अ सुद्धा उपलब्ध असल्याचे निवेदन कर्त्यांचे म्हणणं असून मंदिराचे एकूण क्षेत्रफळ 1294.97 चौरस फूट असून मंदिराचे एकूण बांधकाम 300 फूट जागेवर आहे. गावातील आदिवासी समाज येथे पूजा करूनच शुभकार्याला सुरुवात करतात.आई माऊली हे आदिवासी समाजाचे दैवत असून समाजाची यावर श्रद्धा आहे. मात्र, मंदिराचे पूर्व बाजूकडील जागेवर गावातील गैअर्जदार नथू नानाजी बलकी यांनी अतिक्रमण करून घर बांधले आहे. त्यांचा या जागेची काहीही संबंध नाही. समाज बांधवांनी मंदिराच्या जागेवर बांधकाम करू नका अशी विनंती केली. मात्र त्या विनंतीला न जुमानता घराचे बांधकाम केल्याचा आरोप निवेदनकर्त्यांचा आहे.
याबाबत ग्रामपंचायत कार्यालय अडकोली यांना तक्रार केली असता ग्रामपंचायत ने कोणतीही ठोस पावले उचलली नाही. उलट पोलीसात तक्रार देऊन आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल रामकृष्ण जुमनाके, प्रवीण यादव कुडमेथे, विनायक महादेव जुमनाके, अनिल भालचंद्र जुमनाके यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहे.