सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त जन्मोत्सव सोहळा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने श्री कृष्ण जन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी अॅड. कुणाल विजय चोरडिया, उपाध्यक्षपदी शुभम मदान, श्याम लहरीया, सचिवपदी उमेश पोद्दार, सहसचिव सुधीर तलसे, कार्याध्यक्ष राहुल मुंजेकर,
सह कार्याध्यक्ष अभय नागपुरे, कोषाध्यक्ष जयंत पांडे, सह कोषाध्यक्ष सागर मदान, संयोजक मयूर गोयनका, प्रसिद्धी प्रमुख सत्यजित ठाकुरवार, सह प्रसिध्दी दिपक पाऊणकर, सोशल मीडिया सुनील तुगनायत, अरीहंत तातेड, गौरव डोडळे, तर सल्लागार समिती मध्ये विजय चोरडिया, आशिष गुप्ता, विजय पुण्यानी, नारायण गोडे, संतोष मार्कंडे, मुलचंद जोशी, दिवान फेरवाणी, राजाभाऊ बिलोरीया, अरुण कावडकर, गजानन बल्लुरवार, सुरेश मांडवकर, अनिल रेभे, विशाल दुधबळे, दिलीप वनकर यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन:
श्री कृष्ण जन्माष्टमी येत्या 15 ऑगस्ट ला असुन त्यानिमित्त वणीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष अॅड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे.