यवतमाळ : सोळाही तालुक्यात देशव्यापी संपाला भाकप व आयटकचा पाठिंबा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, वणी, मारेगाव, झरी,पांढरकवडा,घाटंजी,आर्णी,उमरखेड,महागाव,पुसद,दारव्हा,नेर,बाभुळगाव,कळंब,राळेगाव,दिग्रस येथे भाकप, आयटक व किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयावर जोरदार मोर्चे, धरणे व निदर्शने करुन निवेदने देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, मदतनीस,शालेय पोषण आहार कर्मचारी कोळसा कामगार, विद्युत कर्मचारी,अतिक्रमणधारक शेतकरी,शेतमजूर यांनी संपात सहभाग नोंदविला. 

आयटक संलग्न एम एस सी बी वर्कर्स फेडरेशन, कंत्राटी बँक कर्मचारी, पोस्टाचे कर्मचारी, शिक्षक ह्यांचाही संपात सहभाग होता. केंद्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाचे विरोधात कामगार कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष असून या कामगार कर्मचारी विरोधातील चार लेबर कोड रद्द करा, जनसुरक्षा विधेयक मागे घ्या. योजना कर्मचारी यांना किमान वेतन अदा करा, कंत्राटीकरण व आऊटसोर्सिग बंद करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील एफ आर एस ची सक्ती बंद करा, नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्या, सर्व विभागातील कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा, या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने कामगार कर्मचारी संपात व रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते.

किसान सभेच्या पिक विमा योजनेतील शेतकरी विरोधी बदल रद्द करा, स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना सोलर पंप तात्काळ उपलब्ध करून द्या, हमी भावाचा कायदा करा, 2024 च्या थकीत पिक विम्याची रक्कम तात्काळ अदा करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली.सोबतच विवीध ता लुक्यात स्थानीक प्रश्नांचाही निवेदनात समावेश करण्यात आला.

विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वदुर पाऊस असतानांही लाल सैनिकांनी भरपावसात मोर्चे काढुन जनतेच्या प्रश्नासाठी प्रामाणीक एकजुट दाखविली. संपुर्ण जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पक्ष व आयटकचे सभासद सहभागी झाले.

Post a Comment

Previous Post Next Post