सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहराच्या मुख्य मार्गावरील लालपूलिया रस्त्यावर अनेक जड वाहणांची उभी असलेली वाहने अपघातास निमंत्रण देत आहे, अशा आशयचे निवेदन आज प्रहार च्या वतीने वाहतूक उपशाखा उपविभाग वणी यांना देण्यात आले.
अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या लालपूलिया वणी-यवतमाळ या महामार्गवरील या रस्त्यावर विनाकारण काही वाहने उभी, आडवे तिडवे असतात. ही उभी वाहने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा सुरु आहे या ठिकाणी, विशेषत: लालपूलिया, रस्त्याच्या कडेला किंवा अगदी मधोमध वाहने उभी केलेली, यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. असं निवेदन कर्त्यांचं म्हणणं आहे.
परिणामी, रस्त्यावरील उभी असलेली वाहने सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरतात. अशा परिस्थितीत नाहक जीव गमावण्याची वेळ कोणावर येऊ नये म्हणून कारवाई करणे आवश्यक असून तत्काळ कठोर पाऊले उचलून जनतेला सुरक्षा प्रदान करावी,अन्यथा संघटनेचे वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार चे वणी शहराध्यक्ष सय्यद अहेमद यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.