सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या या प्रभाग चे नाव वेल्हाळा देण्यात आले असले तरी वेल्हाळा ही केवळ महसूल शिव आहे. तेथे कोणतेही स्वतंत्र मतदान केंद्र नाही. या शिव मध्ये ग्रामपंचायत, शाळा, शासकीय कार्यालये अथवा सार्वजनिक सेवा संस्था देखील अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या नावाने मतदारसंघ ओळखणे दिशाभूल करणारे असून स्थानिक लोकशाही प्रक्रियेत सहभाग नसलेल्या महसूल शिवाचे नाव देणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याउलट लाठी ही ग्रामपंचायत प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्येची असून येथे शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, वसाहती व अन्य महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे प्रभागात प्रत्यक्ष व प्रभावी भूमिका बजावणारे केंद्र लाठी च असल्याने, या सर्कलचे नाव लाठी करणे स्थानिक वास्तवाशी सुसंगत राहील, असे ॲड, राहुल खारकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वी सुध्दा या सर्कलचे नाव लाठी-लालगुडा असे होते, अशी माहिती देत त्यांनी ऐतिहासिक संदर्भ ही दिला आहे. सध्याचे वेल्हाळा हे नाव सर्वसामान्य जनतेमध्ये गोंधळ निर्माण करणारे आहे. ते बदलणे अत्यावश्यक असल्याचे मत ग्रामस्थांच्या वतीने ॲड, राहुल खारकर यांनी व्यक्त केले. या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने गांभीर्याने विचार करून लाठी नाव निश्चित करावे, अशी आग्रही मागणी ॲड, राहुल खारकर यांनी केली आहे. या मागणीला स्थानिक ग्रामवासीयांचा जोरदार पाठिंबा मिळत असून या मागणीचा सकारात्मक निर्णय होईल, की नाही याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.