Top News

मारेगाव तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : मारेगाव तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय मारेगाव येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार इंगोले,वणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 16 ग्रामपंचायतींमध्ये महिला मंडळी निश्चित झाल्या असून अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचे आरक्षणामुळे लढू पाहू म्हणणाऱ्याचा हिरमोड झाला आहेत.

या सोडतीत वनोजादेवी अनुसूचित जातींसाठी, तर गौराळा व टाकळखेडा अनु. जमाती महिलांसाठी आरक्षित ठरल्या. आकापूर व करणवाडी अनु. जमातींसाठी, तर किन्हाळा, कोथूर्ला, देवाळा यांसह 5 ग्रा.पं. मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्या. कोलगाव, चिंचमंडळ यांसह 4 ग्रा.पं. मागासवर्गीय सर्वसाधारणासाठी तर 8 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या राहिल्या आहेत.
Previous Post Next Post