Top News

सौ वंदना गोहोकार यांचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सौ. वंदना शामराव गोहोकार (रा. पुरड) यांचे आज दुपारी साडेतीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहोकार यांच्या मातोश्री होत्या. या दुःखद घटनेने राजकीय तथा मनसैनिकात शोककळा पसरली आहे.

फाल्गुण गोहोकार यांच्या मातोश्री वंदना गोहोकार ह्या शेतात काम करत असताना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला,आणि त्यांचं दुःखद निधन झाले. तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहोकार यांच्या मातोश्रीची निधनाची बातमी कळताच राजकीय, सामाजिक व तसेंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुरड येथे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार नातेवाईक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरड येथील मोक्षधामात पार पडला. 

सौ. गोहोकार यांच्या पश्चात पती,दोन मुले,स्नुषा व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post