सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील रवी नगर येथील वास्तव्यास असलेले हाजी शरीफ खान यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारपणात होते. दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हाजी शरीफ खान हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते.वणी शहरात त्यांचे वेगळे नाव होते. आज 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता वणी शहरातील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या रवी नगर येथील घरून यांची अंतिम यात्रा निघेल. हाजी खान यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, स्नुषा, नातू,नाती असा मोठा आप्त परिवार आहे.
💐सह्याद्री चौफेर परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली