Top News

दुःखद..अपघातात कोरपेनवार सरांचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी येथील ५७ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२० जुलै) पहाटे ४ च्या सुमारास घडली. दिलीप नारायणराव कोरपेनवार असे मृताचे नाव आहे. नगर परिषद शाळा क्रमांक ८ मध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत ते होते. चिमूर वरोरा मार्गांवरील आनंदवन नजीक परसोडा फाट्यावर एका ट्रकनी त्यांच्या मालवाहू वाहणाला धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने सरांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तज्ञांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती वणी शहरात पसरताच शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी वा भाऊ असा परिवार आहे.

💐सह्याद्री चौफेर परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली


Previous Post Next Post