युवा व्यावसायिकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कणकवाडी येथील रहिवाशी असलेले व्यावसायिक विनोद गोविंदराव मृत्यलवार (वय 53) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ते पचमढी (मध्य प्रदेश) येथे देवदर्शनासाठी गेले असता हृदय विकाराच्या झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज 22 जुलैला पहाटे उघडकीस आली. 

वणी शहरातील विनोद मृत्यलवार यांचे टिळक चौकातील शिवतीर्थ कॉम्प्लेक्स येथे सायकल व दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. ते आपल्या मुलासह पचमढी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान 22 जुलैला पहाटेच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला. आणि त्यातच त्यांचे निधन झाले. तरुण होतकरू व्यावसायिकाचा असा हा अचानक मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 




Previous Post Next Post